Saturday, 17 December 2016

रम्य ते बालपण .................

रम्य ते बालपण .................

           लहानपण देगा देवा , मुंगी साखरेचा रवा 
                     संत तुकारामांनी या सुंदर ओळी बालपणासाठी लिहून ठेवल्या आहेत. आज माझ्या मुलांचे बालपण पाहताना, अनुभवताना नकळतपणे माझे  बालपणीचे दिवस माझ्या  डोळ्यांसमोर येतात. आपण काहीतरी हरवून गेलोय असं वाटत राहत. का मोठे झालो आपण? हा विचार मनात येतो.
                  माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आज मुले वावरत आहेत. त्यामुळेच मुलांच्या बालपणीच्या आठवणी चित्रबद्ध करून ठेवता येणे शक्य झाले आहे.